कुंभोजमध्ये कर्मवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:10+5:302021-09-23T04:26:10+5:30
बसस्थानक परिसरातील कर्मवीरांच्या अर्धाकृती पुतळ्यास सरपंच माधुरी घोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे ...

कुंभोजमध्ये कर्मवीरांना अभिवादन
बसस्थानक परिसरातील कर्मवीरांच्या अर्धाकृती पुतळ्यास सरपंच माधुरी घोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. रयत संकुल येथे कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, कर्मवीर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत आदित्य ग्रुप गणेशोत्सव मंडळ, तसेच धनश्री हराळे यांनी आदर्श गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमास पं. स. सदस्या सपना पांडव, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, ‘शरद’चे संचालक आप्पासाहेब चौगुले, किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, सुशांत पाटील, अनिल भोकरे, कलगोंडा पाटील, सी. बी. पाटील, रयत संकुलचे संचालक सुरेश मसुटगे, मुख्याध्यापक सागर माने, आदी उपस्थित होते.