कलाविष्काराने ढोलकीसम्राटांना अभिवादन

By Admin | Updated: December 9, 2014 00:33 IST2014-12-09T00:13:13+5:302014-12-09T00:33:01+5:30

यासीन म्हाब्री स्मृतिदिन : ताल बहाद्दर पुरस्काराचे वितरण

Greetings to the drummers by artistic discovery | कलाविष्काराने ढोलकीसम्राटांना अभिवादन

कलाविष्काराने ढोलकीसम्राटांना अभिवादन

कोल्हापूर : ढोलकी-तबला वादन स्पर्धा, एकल तबला, ढोलकी वादन, फ्युजन, लावणी गीते अशा कलाविष्काराने ढोलकीसम्राट यासीन म्हाब्रींचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
ढोलकीसम्राट यासीन म्हाब्री फौंडेशनच्यावतीने आज, सोमवारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी तबला व ढोलकीवादन स्पर्धा झाल्या. त्यात शालेय विद्यार्थ्यांनी एक ताल, दृतताल, त्रिताल, तोडा, कायदे रेले यांची नजाकत पेश केली. आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी विविध कलाविष्कार सादर झाले. सुरुवात विनोदकुमार लोहिया, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मनोहर कुर्इंगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी तानाजी वाडेकर यांना ‘ताल बहाद्दर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला तसेच उषा पवार, मंगला साखरेविधाते, एन. रेळेकर, कासम मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. रजनी व वैष्णवी गोरड यांनी गणेश वंदना सादर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to the drummers by artistic discovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.