सरसेनापती धनाजीराव जाधव यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST2021-06-29T04:16:24+5:302021-06-29T04:16:24+5:30

वडगाव नगरपालिका, जिल्हा शाहीर परिषद यांच्या विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार नगराध्यक्ष ...

Greetings to Commander-in-Chief Dhanajirao Jadhav | सरसेनापती धनाजीराव जाधव यांना अभिवादन

सरसेनापती धनाजीराव जाधव यांना अभिवादन

वडगाव नगरपालिका, जिल्हा शाहीर परिषद यांच्या विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, डाॅ. शाहीर राजू सावंत यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तर सरसेनापती धनाजीराव जाधव व त्यांच्या पत्नी गोपिकाबाई याच्या समाधीस आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी शाहीर राजू राऊत यांनी सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी सैनिक (मावळा) ते सरसेनापती अशी पराक्रमाने बढती मिळवली आहे. ते शूर आणि करारी योद्धे होते.

या वेळी अजित आयरेकर स्फूर्तिगीत सादर केला. सूत्रसंचालन शहाजी माळी यांनी केले. शामराव खडके आभार मानले. या वेळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, अजय थोरात, संदीप पाटील, शबनम मोमीन, महेश पाटील आदी उपस्थित होते.

कोल्हापूर रोडवरील प्रवेशद्वारास सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे नाव

कोल्हापूर रोडवर कमानीचे नूतणीकरण सुरू आहे. याबाबत सोशल मीडियावर सरसेनापती जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत होती. मात्र, नगराध्यक्ष माळी यांनी सहा महिन्यांपूर्वीच जाधव यांचे नाव देण्याचा ठराव झाला असल्याचे सांगून या प्रवेशद्वारास जाधव यांचेच नाव निश्चित केल्याचे स्पष्टपणे सांगितले.

फोटो कॅप्शन- पेठवडगाव येथे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या ३१३ व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस अभिवादन करताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी, शाहीर डाॅ. राजू राऊत, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, अजय थोरात, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, शामराव खडके आदी उपस्थित होते.

0000

----------

Web Title: Greetings to Commander-in-Chief Dhanajirao Jadhav