शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-कटिहार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, पहिल्याच रेल्वेला प्रवाशांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:55 IST

पुढच्या तिन्ही गाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मध्य रेल्वेच्याकोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसला रविवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून उद्योजक हरीश जैन यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना कोल्हापूर ते कटिहार क्रमांक (गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६) ही साप्ताहिक विशेष रेल्वे सोयीची आहे. या आठवड्यासाठी ही गाडी हाउसफुल्ल झाली आहे.कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, स्थानकप्रमुख आर. के. मेहता, रेल्वे प्रवासी संघटनेचे समन्वयक अनिल तराळ, प्रशांत चौगुले, जितेश कारेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.तत्पूर्वी रेल्वेच्या इंजिनला हार घालून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी या रेल्वे गाडीचे सारथ्य करणारे कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उलपे यांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत हा मुद्दा उपस्थित करून खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेकडे याबाबत पाठपुरावा केला होता.

चार फेऱ्या होणार, सर्वांचे आरक्षण फुल्ल..कोल्हापुरी–कटिहार व कटिहार–कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारस, जबलपूर, प्रयागराज छावकी, अयोध्या जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराय या प्रमुख स्टेशनवर थांबणार आहे. यामुळे कोल्हापुरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या गाडीच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल झाले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद बघता या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सोडण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी