कब्रस्तान मस्जिद : सामाजिक बंधुत्वाचे दर्शन
By Admin | Updated: July 16, 2014 01:01 IST2014-07-16T00:51:23+5:302014-07-16T01:01:06+5:30
रमजान-भाग १०

कब्रस्तान मस्जिद : सामाजिक बंधुत्वाचे दर्शन
एम. ए. पठाण - कोल्हापूर
बागल चौक येथील कोल्हापूर शहर कब्रस्तान मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांची कायमच रेलचेल असते. येथील कबस्तानात वृक्षारोपण अंतर्गत रस्ते, स्वच्छता, आदी सुविधा उपलब्ध केल्याने येथील रुपडेच पालटले आहे. सध्या रमजान महिन्यात येथे रोजा इफ्तार, नमाज, तरावीह पठण, आदी धार्मिक कार्य सुरू आहेत. शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव सहभागी होत असतात. परिसरात मुस्लिम बांधव व अन्य धर्मीयांसमवेत सामाजिक बंधुत्वाचे दर्शन घडते.
कब्रस्तान येथे जुनी छोटी मस्जिद होती. आज आकर्षक व सुरेख अशी मस्जिद साकारली आहे. मस्जिद व कब्रस्तान परिसराचे व्यवस्थापन दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, साजिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुन्नत जमात बागल चौकचे चेअरमन व संचालक मंडळ करीत आहेत. येथील सुन्नत जमात व तामिर कमिटी मिळून येथील सर्व कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. मस्जिदमध्ये मौलाना नाजीम पठण नमाज पठणचे, तर तरावीह पठण मुक्ती इर्शाद कोण्णुरे, हाफिज सिद्धीक जावेद, खलिफा करतात, तर आयुब सोलापुरे, नझीर काझी हे बागी म्हणून काम पाहतात. तसेच रोजा इफ्तारसाठी येथे मंडप उभारण्यात आला आहे. सुन्नत जमाततर्फे गरजू लोकांना कॅटरिंंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सुविधेचा लाभ अन्य धर्मीय घेत असतात. लग्नाचे रजिस्टर देणे, गरजूंना मदत केली जाते. कबस्तान मस्जिद सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी अजित जमादार, उपाध्यक्ष हाजी गुलाब सनदी, सेक्रेटरी हाजी अब्दुल हमीद सुलेमान मुल्ला, खजानीस अमिर हामजा पठाण, सदस्य रशीद निजाम जमादार, महंमद रमजान शेख, मेहबुब शिकलगार, बंडूलाल नुरुद्दीन शिकलगार, जैनुद्दीन महमद हनीफ शिकलगार, हाजी आयुब मोमीन, हाजी यास्तीन हुडेकरी, सलीम जमादार, फिरोज मुजावर, हाजी अब्दुल मज्जीद जमादार, निसार मुजावर, जावेद बागवान, हे सर्व संस्थेचे व तामिर कमिटीचे सदस्य आहेत.