कोल्हापुरात आजपासून द्राक्ष महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:54+5:302021-03-26T04:22:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कृषी उत्पन्न समिती सांगली व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यातर्फे आज, शुक्रवारपासून ...

कोल्हापुरात आजपासून द्राक्ष महोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषी उत्पन्न समिती सांगली व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यातर्फे आज, शुक्रवारपासून (दि. २६ ते ३० मार्च) कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. द्राक्षासह बेदाणेही विक्रीसाठी उपलब्ध असतील.
शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. महाेत्सवात ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणीकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के. सुपर, शरद सिडलेस जातींची द्राक्ष खरेदी करता येणार आहेत. नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न समितीचे सभापती दिनकर पाटील व सुभाष घुले यांनी केले आहे.
द्राक्ष महोत्सव : २६ ते ३० मार्च
स्थळ : शाहू स्मारक भवन कोल्हापूर
वेळ : सकाळी ९ ते रात्री ८
--