सैनिकांच्या मालमत्ता करासाठी ग्रामपंचायतींना अनुदान देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:57+5:302021-07-04T04:17:57+5:30
* सैनिक टाकळी ग्रामस्थांचे निवेदन दत्तवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) मधील आजी-माजी सैनिकांची संख्या पंधराशेच्या आसपास आहे. शासनाने ...

सैनिकांच्या मालमत्ता करासाठी ग्रामपंचायतींना अनुदान देणार
* सैनिक टाकळी ग्रामस्थांचे निवेदन
दत्तवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) मधील आजी-माजी सैनिकांची संख्या पंधराशेच्या आसपास आहे. शासनाने गतवर्षी आजी-माजी सैनिकांचा मालमत्ताकर माफी केल्यामुळे सैनिक टाकळी ग्रामपंचायतीचे कररूपी उत्पन्न पूर्णपणे थांबणार आहे. याचा परिणाम थेट गावच्या विकासकामांवर होणार असल्याने ग्रामपंचायतीला मालमत्ता कराचे थेट अनुदान मिळावे, यासाठी कुरुंदवाड काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक टाकळी येथील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ साहेब यांची कागल येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. तसेच गावच्या विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतींना मालमत्ता कराच्या थेट अनुदानासाठी संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. सैनिक टाकळी गावच्या विकासासाठी लवकरच भरघोस निधी देण्याचेही त्यांनी आश्वासन या वेळी दिले. या वेळी विनोद पाटील, स्वप्निल पाटील, तेजस माने उपस्थित होते.
फोटो - ०३०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.