रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:23 IST2021-03-28T04:23:41+5:302021-03-28T04:23:41+5:30

शासनाची रमाई आवास घरकुल योजना आहे. त्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतील १० लाभार्थ्यांनी २ वर्षांपूर्वी ...

Grants to Ramai Awas Yojana beneficiaries soon | रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच अनुदान

रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच अनुदान

शासनाची रमाई आवास घरकुल योजना आहे. त्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतील १० लाभार्थ्यांनी २ वर्षांपूर्वी पालिकेकडे अर्ज केले होते. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी गलांडे, पालिका विभाग कार्यासन ११ प्रमुख दीपक पाटील, समाजकल्याण खात्याचे सहआयुक्त विशाल लोंढे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देऊन लाभार्थ्यांना त्वरित अनुदान देण्याची मागणी केली. यावेळी गलांडे यांनी संबंधित अधिका-यांना रमाई आवास योजनेच्या बैठकीतील निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत अनुदान देण्याचे आदेश दिले. शिष्टमंडळात बाळासो कुरणे, पिटर आवळे, प्रशांत कांबळे, जगदीश लोखंडे, उद्धव निबांळकर, शीतल हेगडे यांचा समावेश होता.

Web Title: Grants to Ramai Awas Yojana beneficiaries soon