शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएचडी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, संशोधक विद्यार्थ्यांची मागणी 

By पोपट केशव पवार | Updated: October 30, 2023 15:58 IST

सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण

कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या अवघ्या २०० संशोधक विद्यार्थ्यांना फिलोशीप देण्यात येणार आहे. २०२३ साठी १४०० विद्यार्थी पात्र आहेत. उर्वरित १२०० विद्यार्थ्यांनी कशी पी.एचडी करायची? समाजाची लोकसंख्या जास्त असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी केली आहे. सरकारने समाजातील संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फिलोशीप द्या या मागणीसाठी कोल्हापूर विभागातील कुणबी-मराठा संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कोल्हापूर विभागीय सारथी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे राज्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मराठा समाज मागास होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने २०१९ पासून पी. एच. डी. करणाऱ्या होतकरू गरीब कुणबी-मराठा विद्यार्थांना सारथीकडून फेलोशिप देण्यास सुरुवात झाली. २०१९ ते २०२१ या कालावधीत सरसकट फेलोशिप दिली.पण मागील दोन वर्षातील म्हणजे २०२२ ते २०२३ मधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यातच १ जानेवारी२०२३ रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सारथीअंतर्गत दरवर्षी फक्त ५० विद्यार्थ्याना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. याप्रश्नावर आंदोलन केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत २०० जागा करण्यात आल्या. या फिलोशीपसाठी १३१२ पात्र विद्यार्थ्यांमधून केवळ २०० विद्यार्थी सीईटी परीक्षेद्वारे घेण्यात येण्याचे जाहीर केले. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन २०२३ साठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी सरसकट निवड करा, बार्टी, टीआरटीआय या संस्थेप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील पी.एचडी नोंदणी दिनांकपासून फेलोशिपचालाभ द्या अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत निर्णय न घेतल्यास मराठा समाज व समाजातील संशोधक विद्यार्थीतीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीmarathaमराठा