शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक कांबळेचे सोमवारी निलंबन, जिल्हा परिषदेला ‘लाचलुचपत’चा अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:30 IST

पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.

ठळक मुद्देग्रामसेवक कांबळेचे सोमवारी निलंबनजिल्हा परिषदेला ‘लाचलुचपत’चा अहवाल प्राप्त

कोल्हापूर : पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.एलईडी बसविण्याच्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना कांबळे याला मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले होते. याच बिलासाठी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनीही दहा हजार रुपये मागितल्याचे चौकशीत पुढे आल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर धरणगुत्तीकर कार्यालयात आलेले नाहीत. त्यांनी जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.‘लाचलुचपत’चा अहवाल आल्याने शनिवारी कांबळे याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे चार दिवस रजेवर असून ते सोमवारी (दि. २१) कार्यालयात उपस्थित होणार आहेत. त्यामुळे मित्तल यांच्या सहीनंतर निलंबनाचे आदेश काढण्यात येतील. मात्र धरणगुत्तीकर अजूनही पसार आहेत. ते जामिनासाठी प्रयत्न करीत असले तरी अशा प्रकरणामध्ये तो मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर