ग्रामस्थांनी उभारला शाळेसाठी निधी
By Admin | Updated: May 7, 2015 00:20 IST2015-05-06T23:00:45+5:302015-05-07T00:20:02+5:30
पालक व देणगीदारांच्या सहभागातून पन्नास हजार रुपयांचा निधी जमला.

ग्रामस्थांनी उभारला शाळेसाठी निधी
आंबा : शाळेच्या विकासासाठी शैक्षणिक निधी उपलब्ध करण्यासाठी आठखूरवाडीने लोकसहभागातून विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक उपक्रम राबविला. पालक व देणगीदारांच्या सहभागातून पन्नास हजार रुपयांचा निधी जमला. शालेय सजावट व प्रांगणात शेडची उभारणी यातून होत असल्याचे मुख्याध्यापक तुकाराम दळवे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दाजी जाधव यांनी सांगितले.
कडवी खोऱ्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देताना शालेय सुधारणा करणारा दुहेरी हेतू साध्य झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन धोंडिराम तवलके यांच्या हस्ते झाले. यावेळी देणगीदारांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. सांस्कृतिक उपक्रमातील अनुक्रमे विजेते असे : संस्कार संस्कृती ग्रुप आंबा, हुंबवली नृत्य ग्रुप, बामणोली दीपनृत्य ग्रुप, उत्तेजनार्थ आठखूरवाडी संघ. वैयक्तिक स्पधेर्तील अनुक्रमे विजेते - रिया अशोक कुंभार (निळे), शुभांगी पाटील (तळवडे), शिवानी किरवे (बोंडे), ऋतिक जाधव (आठखूरवाडी). दीपक गावडे व प्रमोद माळी यांनी परीक्षण केले.
दाजी जाधव, बाबासो जाधव, तानाजी जाधव, दत्ताराम जाधव, सरदार वरेकर, विकास साबळे, राजू जाधव, केंद्रप्रमुख कृष्णा कडू,
सह्याद्री स्पोर्टस् क्लबच्या तरुणांचे सहकार्य लाभले. अध्यापिका सीमा पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)