शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:32 IST

ग्रामपंचायतीची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार

गणपती कोळीकुरुंदवाड : जिल्हा परिषद शाळांचेवीजदेयके ग्रामपंचायतीने २६ जानेवारीपूर्वी भरावी व २७ तारखेपर्यंत त्याचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्युत दिव्यांनी झळकणार असल्याने शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतींवर शाळांच्या वीजबिलांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने ग्रामपंचायतींची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार आहे.जिल्हा परिषद शाळेचे वीजबिल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक लोकवर्गणीतून भरत असे. विजेचा फारसा वापरच नसल्याने नाममात्र वीजबिल भरण्यासाठी वेगळ्या निधीची गरज भासत नव्हती. मात्र, बदलत्या शिक्षण पद्धतीत डिजिटल शाळा, मोबाइल, टॅब, संगणक त्यासाठी इन्व्हर्टर आदींमुळे शाळेमध्ये वीजवापर वाढला आहे. त्यामुळे वीजबिलही जास्त येत असल्याने शिक्षकांची आर्थिक अडचण झाली होती. बिले भरली नसल्याने महावितरण कंपनीने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी डिजिटल शाळा विजेअभावी अडचणीत आली होती. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी येडगे यांनी शैक्षणिक प्रगतीला गती देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे वीजदेयके ज्या-त्या ग्रामपंचायतीने भरण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी १५ वा वित्त आयोग, स्वनिधी अथवा ग्रामपंचायतीकडील इतर निधीचा वित्तीय नियमांचे पालन करून वीजबिले भरण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे वीजबिलाच्या संकटातून शाळांची सुटका झाली असली तरी ग्रामपंचायतीवर बिलाचा अतिरिक्त ताण पडणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - १०७९शाळांचे वीजबिले थकीत रूपये - ४९ लाख ८ हजार रुपये

ग्रामपंचायतींवर भारबहुतांश ग्रामपंचायतींची कर थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाची वीजबिले भरली नसल्याने अनेक ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन तोडण्याची नामुष्की पत्करावी लागते. अशातच शाळांच्याही वीजबिलांचा भार पडल्याने ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाgram panchayatग्राम पंचायतelectricityवीज