ग्रामपंचायत मानधन सामाजिक कार्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:29 IST2021-02-17T04:29:27+5:302021-02-17T04:29:27+5:30
वाघापूर : समाजासाठी निरपेक्ष सेवा करायची झाल्यास ती कुठल्याही माध्यमातून करता येते. आपण समाजाचे देणे लागतो ही भावनाच माणसाला ...

ग्रामपंचायत मानधन सामाजिक कार्यासाठी
वाघापूर : समाजासाठी निरपेक्ष सेवा करायची झाल्यास ती कुठल्याही माध्यमातून करता येते. आपण समाजाचे देणे लागतो ही भावनाच माणसाला समाधान देणारी ठरते. वाघापूर ग्रामपंचायत सदस्य अभिजित जयसिंग पाटील यांनी आपल्या मानधनातून चार स्वयंचलित कीटकनाशक व तणनाशक पंप, चार ताडपत्री याबरोबरच शेतकरी उपयोगी साहित्य खरेदी करून ते नाममात्र भाड्यावर देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गावाच्या मध्यवर्ती असलेल्या नवोदय दूध संस्थेमध्ये या वस्तू ठेवण्यात येणार असून, तेथूनच त्या नाममात्र भाडेतत्त्वावर लोकांना देण्यात येणार आहेत. चार वर्षांपूर्वी अभिजित पाटील ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. दरवर्षी दिनदर्शिका वाटप, गावातील सणांची माहितीपूर्ण पुस्तिका वाटप असे नित्यनियमित उपक्रम ते सातत्याने करीत असतात.
ग्रामस्थांनीही त्यांच्या या संकल्पाचे स्वागत केले असून, भविष्यातही पाटील यांनी नवनवीन लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे.