ग्रामपंचायत निवडणूक पानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:36+5:302021-01-13T05:05:36+5:30
नेसरी : तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे ५ जागांसाठी चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या ...

ग्रामपंचायत निवडणूक पानासाठी
नेसरी :
तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे ५ जागांसाठी चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. देसाई विरुद्ध देसाई यांच्यात थेट लढत होत आहे. ५ जागेसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी आरक्षित जागेवर हनुमंत सुतार व लक्ष्मीबाई सुतार हे बिनविरोध निवडून आले आहेत. ८४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच एस. एन. देसाई करीत असून त्यांना विश्वंभर देसाई, शिवाजी देसाई, विश्वनाथ देसाई, ईश्वर देसाई व श्रीपतराव देसाई हे साथ देत आहेत. विरोधी नागम्मादेवी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच आनंदराव देसाई करत असून श्रीधर देसाई, माजी सैनिक वसंतराव देसाई, शंकरराव देसाई, चंद्रकांत देसाई, संभाजीराव देसाई, अजय देसाई हे साथ देत आहेत.