(ग्रा.पं.निवडणूक पानासाठी )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:28+5:302021-01-04T04:21:28+5:30

गडहिंग्लज : नरेवाडी (ता. गडहिंग्लज ) गडहिंग्लज येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चाकरमान्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याला ...

(For Gram Panchayat Election Page) | (ग्रा.पं.निवडणूक पानासाठी )

(ग्रा.पं.निवडणूक पानासाठी )

गडहिंग्लज : नरेवाडी (ता. गडहिंग्लज ) गडहिंग्लज येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चाकरमान्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याला अद्याप यश आलेले नाही. उद्या माघारीचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची समजूत काढण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी गावात तातडीने दाखल झाले आहेत. त्यामुळे नरेवाडीकरांच्या निर्णयाकडे हलकर्णी पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

----------

हसुरचंपूमध्ये भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी

गडहिंग्लज : हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे. भाजपा पॅनलचे नेतृत्व माजी सभापती प्रा. जयश्री तेली व संतोष तेली करीत आहेत. त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, तानाजी शेंडगे, लक्ष्मण तोडकर यांनी सर्वपक्षीयांची मोट बांधली आहे. त्यामुळे हसुरचंपूची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title: (For Gram Panchayat Election Page)