शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

ग्रामपंचायतीनं तोडली बंधनं, विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 21:08 IST

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसने, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे, हातातील बांगड्या फोडण्याची कुप्रथा आहे.

कोल्हापूर - देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, असा ठराव हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केला आहे. त्यामुळे विधवांचा सन्मान करणाऱ्या चळवळीत हेरवाड ग्रामपंचायतीचे पहिले पाऊल पुढे पडले आहे. त्यांच्या या निर्णयाचे महिलांसह सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.   पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसने, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे, हातातील बांगड्या फोडण्याची कुप्रथा आहे. समाज सुधारला, शिक्षित झाला, वैज्ञानिक प्रगती झाली तरी अशा कुप्रथेतून वैचारीक दारीद्र्य संपलेली नाही हे सिद्ध होते. पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा ठरविले जाते. तिला सामाजिक, धार्मिक, शुभकार्यात  सहभागी होण्यास अलिखित निर्बंध आहेत. वास्तविक पतीच्या आयुष्यासाठी स्वता झिजणार्या या महिलेला पतीच्या निधनानंतर विधवा म्हणून एकप्रकारे बहिष्कृत करुन सामिजिक अप्रत्यक्ष छळच केला जातो. मात्र,या कुप्रथेविरुद्ध आवाज उठविणे, अथवा अशा प्रथा बंद होवून विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी कोणीही पुढे होताना दिसत नाही. 

हेरवाड (ता. शिरंळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सामाजिक सन्मान देण्यासाठी व विधवा प्रथा बंद करण्यासाठी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी ग्रामसभेत विषय पत्रिकेवर विषय घेवून ठराव केला आहे. यासाठी मुक्ताबाई संजय पुजारी या सूचक असून सुजाता केशव गुरव या दोन्ही सोभाग्यवती  महिलेने अनुमोदन दिले आहे. ग्रामसभेने या ठरावाला एकमताने मंजुरी दिली असून या कुप्रथा विरोधातील चळवळीचे हेरवाड ग्रामपंचायत शिल्पकार ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वच थरांतून स्वागत होत असून या चळवळीला बळ आणि मुर्त स्वरुप येण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

  विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही ही खंत नेहमी सतावत असते. त्यातच महात्मा फुले सामाजिक संस्था बार्शीचे प्रमोद झिंगार्डे यांनी समाजातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी चळवळ उभारली आहे. त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महिला ग्रामसभेत ठराव केला असून या निर्णयाची गावातूनच अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.सुरगौंडा पाटीलसरपंच , हेरवाड ग्रामपंचायत 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWider Opportunities For Womenवॉवkolhapurकोल्हापूर