शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा पुन्हा एल्गार, उद्या सहकुटूंब कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 30, 2023 15:35 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय न घेतल्याने ...

कोल्हापूर : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय न घेतल्याने राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. सरकार विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी उद्या शनिवारी दुपारी १ वाजता सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने १४ मार्च रोजी बेमुदत संप पुकारला होता, अखेर आठ दिवसांनी मुख्यमंत्रयांनी २० मार्चला राज्य समन्वय समितीच्या सुकाणू समितीबरोबर चर्चा करून जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षमी प्रभावाने लागू करण्याचे दिल्यानंतर २१ मार्च रोजी संप स्थगित करण्यात आला.या घटनेला आठ महिने झाले तरी शासनाने निर्णय न घेतल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच ३ नोव्हेंबरला दिल्लीत रामलिला मैदानावर लाखोंचा मोर्चा निघाला.त्यानंतर ८ नोव्हेंबरला राज्यात सहकुटूंब मोर्चा काढण्याचा निर्णय झाला मात्र त्यावेळी परिक्षा व निवडणुकीचे कामकाज असल्याने कोल्हापुरात हा मोर्चा २ डिसेंबरला काढण्यात येणार आहे.

यावेळी खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे भरत रसाळे, शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड, महसूल संघटनेचे राहुल शिंदे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे, यांच्यासह सुधाकर, सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, रमेश भोसले, धोंडीराम चव्हाण, नंदकुमार इंगवले यांच्यासह विविध सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चाचा मार्गटाऊन हॉल-दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय. तिथे प्रमुख वक्त्यांची भाषणे झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. माझे कुटूंब माझी पेन्शन व शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या हे मोर्चाचे घोषवाक्य असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन