शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी

By उद्धव गोडसे | Updated: August 17, 2023 18:39 IST

संशयित गायकवाड याच्या घरझडतीत ६८ वस्तू जप्त 

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर अटक केलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या सांगलीतील घरात छापा टाकून पोलिसांनी ६८ वस्तू जप्त केल्या होत्या. वस्तूंच्या जप्ती वेळच्या पंच साक्षीदारांनी गरुवारी (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत जप्त वस्तू ओळखल्या. सरकार पक्षामार्फत सरतपास झाल्यानंतर संशयितांच्या वकिलांनी उलट तपासात पंच साक्षीदाराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पुढील सुनावणी सात आणि आठ सप्टेंबरला होणार आहे.पानसरे यांच्या खुनानंतर पोलिसांनी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सांगलीतून अटक केली होती. त्यानंतर सांगली पोलिसांच्या मदतीने कोल्हापूर पोलिसांनी समीर याचा भाऊ सचिन विष्णू गायकवाड यांच्या सांगलीतील शंभर फुटी रोड येथील घरात छापा टाकला. त्यावेळी ६८ वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर करण्यात आल्या. जप्ती वेळच्या पंच साक्षीदारांनी सर्व वस्तू ओळखून त्या समीर गायकवाड याच्या घरातून जप्त केल्याचे न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी बुधवारी दिवसभर सरतपास घेतला.बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, अनिल रुईकर, डी. एम. लटके यांनी गुरुवारी पंच साक्षीदाराचा उलट तपास घेतला. काही मुद्द्यांवरून पंच साक्षीदारांची कोंडी करण्याचाही प्रयत्न वकिलांनी केला. संशयित आरोपी समीर गायकवाड न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होता. अन्य तीन संशयित येरवडा तुरुंगातून, तर सहा संशयित बंगळुरू तुरुंगातून व्हीसीद्वारे सुनावणीत सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालयPoliceपोलिस