शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 12:18 IST

फोटोंच्या ओळखीला संशयितांच्या वकिलांचा आक्षेप

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील सुनावणीत सोमवारी (दि. ३) तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर घटनास्थळाचे पंच साक्षीदार सुभाष पोपटराव वाणी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांनी गुन्ह्यातील पाच गोळ्यांच्या जप्त केलेल्या पुंगळ्या ओळखल्या. जप्त केलेली रक्तमिश्रित माती आणि गोळीच्या पावडरचे नमुने न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले. दिवसभरात एकाच साक्षीदाराचा सरतपास पूर्ण झाला. पुढील सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे.पानसरे खून खटल्यातील सुनावणीदरम्यान सोमवारी सरकार पक्षामार्फत घटनास्थळावरील पंच साक्षीदार सुभाष वाणी यांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम आणि त्यानंतर घटनास्थळाचा पोलिसांनी केलेला पंचनामा याबाबत साक्षीदारास प्रश्न विचारले. यावेळी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या पाच गोळ्यांच्या जप्त पुंगळ्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आल्या. पंच साक्षीदार वाणी यांनी त्या पुंगळ्या ओळखल्या. हल्लेखोरांनी पानसरे दाम्पत्यावर झाडलेल्या गोळ्यांपैकी काही गोळ्या जवळच्या भिंतीवर लागल्या होत्या. त्या गोळ्यांची पावडर आणि पानसरे दाम्पत्याच्या रक्ताने माखलेली माती पोलिसांनी जप्त केली होती. ते पुरावेही पोलिसांनी कोर्टात हजर केले.विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सकाळी साडेअकराला सुरू केलेला सरतपास जेवणाची सुटी वगळता सायंकाळी साडेचारपर्यंत चालला. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील अनिल रुईकर यांनी पंच साक्षीदाराच्या उलट तपासणीस सुरुवात केली. पुढील सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन आणि त्यांची वकिलांची फौज उपस्थित होती. सर्व संशयित आरोपींनाही पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते.वकिलांची खडाजंगीसुनावणीदरम्यान पंच साक्षीदाराकडून घटनास्थळावरील काही फोटोंची ओळख पटवण्याचा प्रयत्न विशेष सरकारी वकिलांकडून सुरू होता. मात्र, फोटो काढणाऱ्यांकडून फोटोंची ओळख पटवली पाहिजे. घटनास्थळाच्या पंचाकडून त्याची ओळख कशी पटवली जाऊ शकते, असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये काही काळ खडाजंगी झाली. याबाबत बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायाधीशांना अर्ज दिला. त्यावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती ॲड. समीर पटवर्धन यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय