कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याची सुनावणी कोल्हापुरातच होणार आहे. आज, सोमवारी (दि. ९) जिल्हा न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान संशयित आरोपींवर दोषारोप निश्चिती होण्याची शक्यता आहे. पानसरे हत्येचा तपास आणि खटल्याच्या कामकाजाला गती यावी, अशी मागणी यापूर्वी अनेकदा शहरातील पुरोगामी संघटनांनी राज्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र गेली दोन वर्षे या खटल्याच्या कामकाजाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. आता उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुन्हा खटला गतिमान होण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे आहे.
Govind pansare: पानसरे हत्या खटल्याची आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:47 IST