शासनाच्या आरोग्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार -उपसरपंच सुशांत नाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST2021-09-02T04:53:39+5:302021-09-02T04:53:39+5:30
सांगरूळ : शासनाच्या आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पण त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आपण या सर्व योजना लोकांपर्यंत ...

शासनाच्या आरोग्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार -उपसरपंच सुशांत नाळे
सांगरूळ : शासनाच्या आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पण त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आपण या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपसरपंच सुशांत नाळे यांनी केले.
सांगरूळ येथे शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर होते. या शिबिरात चारशे लोकांना आयुष्यमान भारत कार्डची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या वेळी निवास वातकर म्हणाले, सर्वसामान्य लोकांसाठी आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आयुष्यमान भारत कार्डची योजना उपलब्ध करून देण्यासाठी शाहू नाळे तालीम मंडळाने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळांनी कार्य करत असताना असे लोक हिताचे उपक्रम राबवावेत, असे वातकर म्हणाले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सरदार खाडे, सचिन नाळे, सर्जेराव मगदूम, दत्तात्रय सुतार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत नाळे, प्रशांत खाडे, आनंदा इंगळे, सुनील घुंगुरकर यांचेसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.