शासनाच्या डिजिटल योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:34+5:302021-09-21T04:26:34+5:30
दाटे (ता. चंदगड) येथे लक्ष्मीनारायण ई-ग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कांबळे होते. जाधव म्हणाले, शासनाच्या योजना ...

शासनाच्या डिजिटल योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत
दाटे (ता. चंदगड) येथे लक्ष्मीनारायण ई-ग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कांबळे होते. जाधव म्हणाले, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून मंत्रालयीन कक्ष अधिकारी घनशाम पाऊसकर यांनी रयत फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात पहिलीच ई-ग्रामची अभिनव संकल्पना गावात राबविली आहे. त्यांचा आजूबाजूच्या गावांसह इतरांनाही उपयोग होईल.
फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय साबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नायब तहसीलदार विक्रमादित्य घाटगे, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद शिणगारे, लक्ष्मीनारायण ई-ग्रामचे संस्थापक विनायक पाऊसकर, घनश्याम पाऊसकर, एम.टी. कांबळे, विलास नाईक, प्रकाश खरुजकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास फाउंडेशनच्या अध्यक्षा ऋचा पाऊसकर, पी. टी. पाटील, मधुरा साबळे, परशराम किणेकर, शाहू खरूजकर, मारुती किंदळेकर, ज्ञानेश्वर गावडे, मनोज खरुजकर, प्रकाश खरुजकर, अनिल व्हरावडेकर, सागर रेडेकर, राजू बुरुड, नारायण मोरे, राजू मोटर, निंगाप्पा मोटर, सुनील गावडे, अशोक धुरी , शिवाजी मोरे, जोतिबा मोरे, अण्णा मोरे, संदीप गुरव, किरण नाईक, सरिता गुरव, माधुरी मोरे, पोलीसपाटील संदीप गुरव उपस्थित होते.
रवि पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश खरुजकर यांनी आभार मानले.
फोटो ओळी : दाटे (ता. चंदगड) येथे शुक्रवारी लक्ष्मीनारायण ई-ग्रामच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार विक्रमादित्य घाटगे व मान्यवर उपस्थित होते.
क्रमांक : २००७२०२१-गड-०९