शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची रीत नाही बरी, धरणग्रस्त बसती रस्त्यावरी गं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:39 IST

कोल्हापूर : ‘सरकारची रीत नाही बरी गं, धरणग्रस्त बसती रस्त्यावरी गं, आयाबायांनो कंबर कसून उठा गं, अधिकाऱ्यांना व्हनात घालून ...

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांचा ठिय्या

कोल्हापूर : ‘सरकारची रीत नाही बरी गं, धरणग्रस्त बसती रस्त्यावरी गं, आयाबायांनो कंबर कसून उठा गं, अधिकाऱ्यांना व्हनात घालून कुटा गं...’ अशा गीतांतून व्यथांची मांडणी करीत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस गाजविला. डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन धरणग्रस्तांना चिकाटीने लढण्याची ऊर्मी दिली. जमिनीला जमीन आणि निर्वनीकरण झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धारही व्यक्त केला.

श्रमिक मुक्ती दलातर्फे मंगळवार (दि. १२) पासून राज्यातील नऊ जिल्'ांमध्ये प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापुरात सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनात चांदोली, वारणा, धामणी, उचंगी, सर्फनाला या प्रकल्पांतील बाधित लोकांनी सहभाग घेतला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी संपत देसाई, मारुती पाटील, डी. के. बोडके, वसंत पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना डॉ. पाटणकर म्हणाले, पुनर्वसनाबरोबर समन्यायी विकास या संकल्पनेतून दुष्काळग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांना एकत्रित करून लढा उभारला आहे. देशातील सर्वांत जास्त धरणे असणाºया महाराष्ट्रात दुष्काळ, नापिकी, पाण्यासाठी टाहो फोडण्याची, वणवण करण्याची, आत्महत्या करण्याची वेळ येते हे दुर्दैवी आहे. ज्यांच्या उरावर पाणी साचविले, अभयारण्ये उभारली त्यांनाच उपाशी का राहावे लागते, याचा विचार सरकार कधी करणार आहे की नाही? जर करणार नसेल तर आपणच सरकारला धक्का देऊया.धरणग्रस्त वसाहत सुविधांसाठी पाच कोटी वर्गडॉ. पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट घेण्यापूर्वी वनविभागाच्या अधिकाºयांची भेट घेतली. ‘वन्यजीव’चे मुख्य वनसंरक्षक अनिल गुजर, ‘प्रादेशिक’चे वनसंरक्षक क्लेमेंट बेन, उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या सहसंचालक डॉ. विनिता व्यास यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नागरी सुविधांसाठीचे पाच कोटी तातडीने इरिगेशन विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. या निधीतून जैनापूर, भेंडवळे, नरंदे येथील धरणग्रस्त वसाहतींमध्ये प्राधान्याने पाणीयोजना राबविण्याचा निर्णय झाला. सांगलीत असलेल्या कोयनेच्या ५५ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढून त्याचे प्रकल्पग्रस्तांना तातडीने वाटप करण्याचाही निर्णय झाला.जमिनीला जमीन घेतल्याशिवाय माघार नाहीप्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी पैसे देण्याचे सरकारचे धोरण आहे. चिकोत्रा प्रकल्पग्रस्तांना पैसे घेतल्याचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे ‘जमिनीला जमीन’ हेच आमचे धोरण आहे. दहा-दहा वर्षांपासून निर्वनीकरणाचे प्रस्ताव पडून आहेत. अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्वांत मोठे आव्हान आहे. ऊन, वारा, पाऊस यांवर सर्वांची मालकी असताना त्यापासून निर्माण होणाºया ऊर्जेवर, उत्पादनावर सर्वसामान्यांचाच अधिकार असल्याने समन्यायी विकास या तत्त्वाने रॉयल्टी म्हणून सर्वसामान्यांना सोईसुविधा पुरवाव्यात, असा आपला आग्रह आहे.- डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दल, राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक मुक्ती दलातर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या दुसºया दिवशी डॉ. भारत पाटणकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण