साखर कामगारांच्या वेतन कराराला शासनाचा ठेंगा

By Admin | Updated: August 1, 2014 23:24 IST2014-08-01T22:32:54+5:302014-08-01T23:24:16+5:30

वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेश

Government will be able to pay salaries to the wages of sugar workers | साखर कामगारांच्या वेतन कराराला शासनाचा ठेंगा

साखर कामगारांच्या वेतन कराराला शासनाचा ठेंगा

प्रकाश पाटील - कोपार्डे
सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गोडवा निर्माण करणाऱ्या या उद्योगातील साखर कामगारांचा तुटपुंज्या वेतनश्रेणीने कडवटपणा निर्माण झाला आहे.
मागील वेतन कराराची मुदत संपून चार महिने झाले, तरी साखर कारखानदार व शासनाच्या उदासीन धोरणामुळे नवीन वेतन कराराला ठेंगा दाखविल्यामुळे साखर कामगार आक्रमक पवित्र्यात असून, येत्या ८ आॅगस्टला महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात सध्या दीड लाख साखर कामगार आहेत.
साखर कामगारांच्या मागील वेतनमंडळाची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. एप्रिल २००९ ते एप्रिल २०१४ या पाच वर्षांसाठी हा वेतन करार होता. यावेळी साखर कामगारांना १८ टक्के वेतनवाढ देताना ती दोनवेळा देण्यात आली. मागील कराराला तब्बल दीड वर्षाचा काळ लोटल्यानंतर हंगामाच्या सुरुवातीला साखर कामगारांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर २०१० मध्ये ६ टक्के अंतरिम वाढ व २०११ मध्ये १८ टक्के एकूण वाढ जाहीर करण्यात आली. ही वाढ देतानाही साखर कामगारांना ती एकरकमी न देता या वाढीच्या फरकापोटी देण्यात येणाऱ्या रकमा देण्यासाठी कारखान्यांना तीन टप्प्यांत तेही २०१४ पर्यंत देण्याची मुभा देण्यात आली.
एकवेळ हा करार झाला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करत कारखानदारांनी ही वेतनवाढ दिली की नाही याबाबत ना शासनाने, ना साखर आयुक्तालयाने लक्ष दिले.
वेतन मंडळासाठी त्रिपक्षीय समिती स्थापण्याचा आदेश
साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, साखर संघ अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त व साखर उद्योग सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीअगोदर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी साखर कामगार वेतन व त्यांच्या प्रश्नांसंबंधी त्रिपक्षीय समिती नेमण्याचे आदेश साखर आयुक्त व विजयसिंह मोहिते पाटील यांना दिले होते; मात्र चार महिने झाले तरी ही समिती स्थापण्यास मुहूर्त मिळालेला नाही.

--येत्या ८ आॅगस्टला ५० हजार साखर कामगारांचा साखर आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन
--त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची केवळ घोषणाच
४४० टक्के वेतनवाढीची मागणी
साखर कामगारांच्या प्रमुख मागण्या
एप्रिल २०१४ रोजी होणाऱ्या एकूण वेतनावर (सर्व भत्त्यांसह) ४० टक्के वाढ
नोकरीच्या कालावधीवर आधारित जादा वेतनवाढ यात चार वर्षे पूर्ण केल्यास १ वेतनवाढ, ६ वर्षांसाठी दोन, ८ वर्षांसाठी तीन व १२ वर्षे नोकरी पूर्ण करणाऱ्यांना चार वेतनवाढी जादा देण्यात याव्यात.
रात्रपाळी भत्ता, वैद्यकीय भत्ता धुलाईभत्ता यात वाढ मिळाली

Web Title: Government will be able to pay salaries to the wages of sugar workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.