बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षकांच्या मूल्यमापनाचा निर्णय शासनाने रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:31+5:302021-06-01T04:17:31+5:30

कोल्हापूर : बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सोमवारी केली. ...

The government should cancel the decision of evaluation of teachers through external system | बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षकांच्या मूल्यमापनाचा निर्णय शासनाने रद्द करावा

बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षकांच्या मूल्यमापनाचा निर्णय शासनाने रद्द करावा

कोल्हापूर : बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सोमवारी केली. या व्यासपीठाच्या शिष्टमंडळाचे निवेदन शिक्षण उपसंचालकांच्या वतीने शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी स्वीकारले.

शालेय शिक्षण विभागाने बाह्य यंत्रणेमार्फत ३० कोटी रुपयांची निविदा मंजूर करून शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची निविदाही प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांचे काम अतिशय चांगले आणि दर्जेदार आहे. अशा प्रकारच्या मूल्यमापनाचा घाट घालून शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा हा प्रकार आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा, दुर्दैवी आहे, तो ताबडतोब रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे शैक्षणिक व्यासपीठाने दिला आहे. या शिष्टमंडळात एस. डी. लाड , व्ही. जी. पोवार, वसंतराव देशमुख, बाबासाहेब पाटील, संजय पाटील, आर. वाय. पाटील, उदय पाटील, समीर घोरपडे, दत्तात्रय जाधव, आदींचा समावेश होता.

चौकट

‘डाएट’मार्फत मूल्यमापन करावे

शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचे पर्यवेक्षण झाले पाहिजे हे सर्वांनाच मान्य आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी. त्याचे मूल्यमापन व्हावे यासाठी शासनाची अधिकृत प्रशासकीय यंत्रणा जिल्हा प्रशिक्षण संस्था (डाएट) आहे. या संस्थेच्या माध्यमातून मूल्यमापन केले जावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फोटो (३१०५२०२१-कोल-शिक्षक निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाच्या वतीने अध्यक्ष एस. डी. लाड यांनी शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांना निवेदन दिले. या वेळी शेजारी व्ही. जी. पोवार, वसंतराव देशमुख, उदय पाटील, समीर घोरपडे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

310521\31kol_1_31052021_5.jpg

===Caption===

फोटो (३१०५२०२१-कोल-शिक्षक निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाच्यावतीने अध्यक्ष एस. डी. लाड यांनी शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी निवेदन दिले. यावेळी शेजारी व्ही. जी. पोवार, वसंतराव देशमुख, उदय पाटील, समीर घोरपडे, आदी उपस्थित होते.

Web Title: The government should cancel the decision of evaluation of teachers through external system