शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Maratha Reservation : समाजाच्या सवलतींबाबत शुक्रवारपर्यंत भूमिका जाहीर करावी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 8:11 PM

Maratha Reservation : उपसमितीमुळे कोणताही लाभ मराठा समाजाला झालेला नाही. आरक्षण रद्दची नैतिक जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. सध्याची समिती बरखास्त करावी. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना या समितीवर नियुक्ती करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या सवलतींबाबत सरकारने शुक्रवारपर्यंत भूमिका जाहीर करावी अन्यथा शनिवारपासून राज्यभर आंदोलन : सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

कोल्हापूर :उपसमितीमुळे कोणताही लाभ मराठा समाजाला झालेला नाही. आरक्षण रद्दची नैतिक जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. सध्याची समिती बरखास्त करावी. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना या समितीवर नियुक्ती करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती द्याव्यात. त्याबाबतची भूमिका राज्य सरकारने शुक्रवार (दि. १४ मे) पर्यंत जाहीर करावी, अन्यथा शनिवार (दि. १५ मे) पासून राज्यभर गनिमी काव्याच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे दिला. सन २०१४ ते २०२१ मध्ये मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी. त्यांची निवड रद्द करू नये. नवीन पदभरती करण्यात येऊ नये. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शैक्षणिक, नोकरी आदींबाबत कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबाबतची भूमिका लवकर जाहीर करावी. ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याचा निर्णय सरकारने विशेष अधिवेशनाद्वारे घ्यावे. राज्यात ठोक मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर सरकारने येऊ देऊ नये, असे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सवलतींबाबत निर्णय घेण्यास आम्ही सरकारला शुक्रवारपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची सुरुवात कोल्हापूरमधून होईल, असे सचिन तोडकर यांनी सांगितले. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता उपसमिती नेमणे म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा आहे. ही समिती बरखास्त करण्यात यावी. कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन केले जाईल, असे दिलीप पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस भगवानराव काटे, स्वप्नील पार्टे, भास्कर पाटील, नितीन देसाई, पंकज कडवकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर