आरक्षण मिळेपर्यंत शिरोळमध्ये सरकारी कार्यक्रमांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:25 AM2021-05-09T04:25:53+5:302021-05-09T04:25:53+5:30

शिरोळ सकल मराठा समाज यांच्या वतीने शिवाजी चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या... अशा ...

Government programs banned in Shirol till reservation is granted | आरक्षण मिळेपर्यंत शिरोळमध्ये सरकारी कार्यक्रमांना बंदी

आरक्षण मिळेपर्यंत शिरोळमध्ये सरकारी कार्यक्रमांना बंदी

Next

शिरोळ सकल मराठा समाज यांच्या वतीने शिवाजी चौकातून निषेध रॅली काढण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या... अशा घोषणा देत पंचायत समितीसमोर रॅली आल्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील अनेक तरुणांना विविध शासकीय सवलतींना मुकावे लागणार आहे. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत आपत्कालीन बाबी वगळता तालुक्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही. सर्व कार्यक्रमांना विरोध करून हाणून पाडण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे दिला. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.

०८ शिरोळ मराठा रॅली

फोटो ओळ : शिरोळ येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली.

Web Title: Government programs banned in Shirol till reservation is granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app