पॉवरलूम उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:22+5:302020-12-09T04:20:22+5:30
यड्राव : पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कमधील पॉवरलूम उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग राज्यमंत्री ...

पॉवरलूम उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
यड्राव : पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कमधील पॉवरलूम उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंगळवारी वस्त्रोद्योग विभागाला दिले.
हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे वसलेल्या पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कमधील छोट्या चाळीस पॉवरलूम उद्योजकांनी निर्यातवरील बंधनाबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेतली होती. या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिक घेत मंगळवारी राज्यमंत्री यड्रावकर यांनी मुंबई येथे वस्त्रोद्योगाची बैठक बोलविली होती. बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष विनोद झंवर आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पॉवरलूम उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी सांगितले. तसेच उद्योजकांच्या अडीअडचणींवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे हिंगोलीतील बंदअवस्थेत असलेल्या पॉवरलूम उद्योगाला पुन्हा चालना मिळणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
फोटो - ०८१२२०२०-जेएवाय-०७
फोटो ओळ - मुंबई येथे वस्त्रोद्योगाच्या बैठकीत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले.