शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटीकरण, खासगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची कोल्हापुरात केली होळी

By विश्वास पाटील | Updated: October 2, 2023 17:46 IST

कोल्हापूर : कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची जाहीर होळी सोमवारी सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर  यांच्यातर्फे माजी न्यायमूर्ती ...

कोल्हापूर : कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची जाहीर होळी सोमवारी सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर  यांच्यातर्फे माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांच्या हस्ते उभा मारुती चौक येथे केली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत आसगावकर आणि आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या. सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यातर्फे सकाळपासून उभा मारुती चौक येथे उपोषण आणि धरणे आंदोलन झाले. सुरुवातीला आदित्य राज आणि विरा चव्हाण या दोन लहान मुलांच्या हस्ते  आणि आनंदराव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विकास जाधव आणि संजय साळोखे  यानी दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. प्रास्ताविकात .ॲड अजित चव्हाण, यांनी मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यायचे असेल तर ते लोकसभेमध्ये 50 टक्क्यावरील आरक्षणाचा ठराव करूनच द्यावे लागेल हे स्पष्ट केले. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून शासनाने मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसली असल्याचे सांगितले. कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी कंत्राटीकरण म्हणजे भ्रष्टाचाराचे कायदेशीर कुरण असून तरुणांना अत्यल्प पगारावर राबवले जाणार असल्याचे सांगितले.आमदार आसगावकर यांनी शाळांचे खासगीकरण केल्यास सर्वसामान्यांचे शिक्षण बंद होणार असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयश्री जाधव यांनी मराठा समाजाच्या व कंत्राटीकरण विरोधी आंदोलनाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. अनिल चव्हाण, अमर जाधव, सुनंदा चव्हाण, शोभा पाटील, रवी चव्हाण, आनंदराव चौगुले, रवी जाधव, पंडित कंगले, प्रा डॉ टी एस पाटील यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाला विविध संघटना आणि तरुण मंडळानी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला.  अनिल चव्हाण यांनी आभार मानले. विकास जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा