शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

शासकीय आदेशाने गुरुजींचे ‘गो गोवा गॉन’-अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:46 IST

गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर

ठळक मुद्देकेवळ तीन दिवसांची रजा मंजूर : कारवाईच्या दणक्याने शिक्षक माघारी

कोल्हापूर : गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर गोवा सहलीचा बेत आखलेल्या गुरुजींनी बुधवारी थेट शाळेतच हजेरी लावली.अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे महाअधिवेशन व राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे ८ व ९ रोजी गोव्यात आयोजन केले आहे.

यासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसह बरेच मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्य अधिवेशन ९ रोजी असताना बऱ्याच शिक्षकांनी ३ ते १३ फेब्रुवारी अशी रजा घेतली आहे. राज्यभरातील जवळपास पाच लाख शिक्षक रजेवर गेले आहेत.

रजेवर जाताना शासनानेच नैमित्तिक रजा मंजूर केली असल्याचे शिक्षक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. अधिवेशन दोन दिवसांचे असताना शिक्षकांनी १० दिवसांची रजा घेतल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातून, विशेषत: पालकांतून संताप व्यक्त केला जात होता. या अधिवेशनासाठी राज्यभरातील निम्म्याहून अधिक शिक्षक एकाचवेळी रजेवर गेल्याने शाळा ओस पडू लागल्या होत्या.

याबद्दल तक्रारी झाल्यानंतर शिक्षण सचिवांनी याची गंभीर दखल घेत थेट कारवाईचा बडगाच उगारला आहे. सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना त्यांनी ई-मेल पाठवून ‘तीन दिवसांव्यतिरिक्त रजा असणाºयांची यादी तयार करून कारवाईस सुरुवात करावी,’ असे आदेश दिले आहेत.

या संदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तत्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागानेही गटशिक्षणाधिकाºयांना वाढीव रजा मंजूर करू नका, तातडीने अहवाल पाठवून द्या, अशा सूचना दिल्या आहेत.आज कारवाईच्या नोटिसा निघणारतीन दिवसांव्यतिरिक्त रजा घेतलेल्या शिक्षकांची यादी आज, गुरुवारी दुपारपर्यंत पाठविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाºयांना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या याद्या संकलित झाल्यानंतर सायंकाळी तातडीने कारवाईच्या नोटिसा लागू होणार आहेत. यातही ज्या शाळेतील सर्वाधिक शिक्षक अधिवेशनाच्या रजेवर गेले आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

कोल्हापूरातून पाच हजार शिक्षक अधिवेशनासकारवाईच्या धसक्याने बहुतांश शिक्षकांनी बुधवारीच शाळेत हजेरी लावत हजेरीपत्रकावर सह्या केल्या. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजारांवर शिक्षक अधिवेशनासाठी गेले होते. गटशिक्षणा-धिकाºयांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देत बºयापैकी शिक्षक कोल्हापुरात परतल्याचे सांगितले.मुख्य अधिवेशन ९ रोजी असताना बºयाच शिक्षकांनी ३ ते १३ फेब्रुवारी अशी रजा घेतलीकेंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसह बरेच मंत्री उपस्थित राहणारराज्यभरातील जवळपास पाच लाख शिक्षक रजेवर गेले आहेत.अधिवेशन दोन दिवसांचे असताना शिक्षकांनी १० दिवसांची रजा घेतल्यामुळे संताप‘लोकमत’ मध्ये सर्वप्रथम वृत्तदोन दिवसांच्या अधिवेशनासाठी गुरुजी दहा दिवसांच्या सुटीवर गेल्याने शाळा ओस पडणार असल्याचे वास्तव सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे मांडले. शासनाने याची दखल घेत, कारवाईचा बडगा उगारत गुरुजींचा सहलीचा बेत हाणून पाडला.

टॅग्स :Teacherशिक्षकgoaगोवा