शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गिरीश जाधव यांच्या शस्त्रसंग्रहासाठी तीन कोटी, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:05 IST

कोल्हापूर : ख्यातनाम शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचा शस्त्रसंग्रह संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी ...

कोल्हापूर : ख्यातनाम शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचा शस्त्रसंग्रह संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले होते. मूळचे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील असलेल्या जाधव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या शस्त्रसंग्रहासाठी व्यतीत केले होते. याची दखल घेत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्यसैनिक ल. मा. जाधव यांचे चिरंजीव असलेल्या गिरीश जाधव यांनी रसायनशास्त्राचा अभियंता म्हणून शिक्षण घेऊन विपणन क्षेत्रात काम केले. परंतु इतिहासप्रेमातून दुर्मीळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद त्यांना जडला. यातून देशभरामध्ये खेड्यापाड्यातून फिरून त्यांनी विविध शस्त्रास्त्रे संकलित केली. प्रत्येक शस्त्राची सविस्तर माहिती, त्या शस्त्राचा कालावधी याचा त्यांनी अभ्यास केला. ही सर्व शस्त्रे केवळ आपल्याकडे न राहता ती समाजासमोर यावीत, नव्या पिढीला हा सर्व इतिहास समजावा, यासाठी त्यांनी ‘शौर्य गाथा’ या नावाने महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही या शस्त्रात्रांचे प्रदर्शन मांडावयास सुरुवात केली.इतिहासकालीन शस्त्रास्त्रे या विषयावर पुस्तकाचे लेखनही त्यांनी सुरू केले होते. तसेच शिवकालीन इतिहास आणि शस्त्रास्त्रांची माहिती देणारे केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतु वयाच्या ७५व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्रसंगी कौटुंबिक गरजा बाजूला ठेवून जाधव यांनी आपली मिळकत या संग्रहासाठी वापरली होती. या त्यांच्या इतिहासप्रेमाची दखल घेत त्यांच्या निधनानंतर त्यांनी संकलित केलेला हा इतिहासाचा अमोल ठेवा संवर्धित व्हावा, यासाठी हा साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार