शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सरकारी कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना कर्जमाफी- कोल्हापूर जिल्ह्यातील ६७२ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:05 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात तब्बल ६७२ सरकारी, निमसरकारी, पेन्शनर्स व पदाधिकाऱ्यांना लाभ दिल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देआयटी विभागाचा आंधळा कारभार; सव्वा कोटी वसूल करण्याचे आदेश

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात तब्बल ६७२ सरकारी, निमसरकारी, पेन्शनर्स व पदाधिकाऱ्यांना लाभ दिल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारच्या आयटी विभागाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला असून, त्यांना लाभ मिळालेले सव्वा कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेला दिल्याने खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी आणि त्यातील पात्र-अपात्रतेचा गोंधळ सुरू असतानाच आता पात्र यादीत चक्क सरकारी कर्मचारी आढळलेले आहेत. जिल्हा बॅँकेंतर्गत शासकीय, निमशासकीय, पेन्शनर्स व पदाधिकारी अशा ६७२ जणांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांना कर्जमाफीचे पैसे मिळाले आहेत. त्यानंतर अपात्र असल्याचा साक्षात्कार आयटी विभागाला झाला असून, सरकारने २८ जूनला जिल्हा बॅँकेला अपात्र लोकांच्या नावासह यादी पाठविली आहे. लाभार्थ्यांची खाती रद्द करून लाभाची रक्कम त्यांच्या नावे खर्च टाकून सदरची रक्कम तत्काळ शासनास परत करावी, असे आदेश बॅँकेला दिले आहेत.

कर्जमाफीचा लाभ मिळून महिना-दोन महिन्यांचा कालावधी झाल्याने संबंधित लाभार्थ्यांनी पैशाची उचल केलेली असणार, त्यामुळे त्यांच्याकडून एक कोटी २६ लाख ९१ हजार ८१० रुपये ७४ पैसे वसूल कसे करायचे? हा पेच आहे. अपात्र यादीत सर्वाधिक करवीर तालुक्यातील ९५ आहेत. 

‘ओटीएस’ला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढकर्जमाफीतील ‘ओटीएस’ योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत दीड लाखाच्या वरील थकबाकीदारांना या योजनेत सहभागी होऊन कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे.अर्ज भरलेच कसे?शासकीय, निमशासकीय, पेन्शनर्स व पदाधिकाºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने त्यांनी अर्ज करू नयेत, असे स्पष्ट आदेश सरकारच्यावतीने देण्यात आले होते. तरीही या लोकांनी अर्ज भरलेच कसे? शासनाच्या फसवणुकीबद्दल त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.संबंधितांना कर्जमाफीचे पैसे मिळाले आहेत. त्यानंतर अपात्र असल्याचा साक्षात्कार आयटी विभागाला झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा