शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांकडे अडकले राज्य शासनाचे ७२ कोटी, आतापर्यंत किती झाली वसुली?.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:19 IST

शासनाच्या वतीने काही संस्थांना कर्ज स्वरुपात रक्कम दिली जाते. या रकमा वेळेत परत करण्याची जबाबदारी संस्थांवर असते. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे गेली पाच-सहा वर्षे सहकारी संस्थांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसते.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सहकारी संस्थांकडे ७२ कोटी ७२ लाख रुपये शासकीय देय रक्कम अडकली आहे. या आर्थिक वर्षात (२०२१-२२) ५ कोटी ५३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, मात्र आतापर्यंत केवळ ५५ लाख ४० हजार रुपयांची वसुली झाली आहे. शासकीय भागभांडवल व शासकीय कर्जाची ३७ कोटी ३८ लाख रुपये संस्थाकडून येणे बाकी आहे.

देशात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात आहेत. काही जिल्हे वगळता बहुतांशी ठिकाणी सहकारी संस्थांचे जाळे पाहावयास मिळते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून उभा राहिलेले उद्योग व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाले. यामुळेच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकारी संस्थांचे योगदान खूप मोठे आहे. सहकारी संस्थांना ताकद देण्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय भागभांडवल दिले जाते. ते ठराविक कालावधीत परतफेड करायचे असते.त्याशिवाय शासनाच्या वतीने काही संस्थांना कर्ज स्वरुपात रक्कम दिली जाते. या रकमा वेळेत परत करण्याची जबाबदारी संस्थांवर असते. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे गेली पाच-सहा वर्षे सहकारी संस्थांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसते. त्यातून शासकीय देय रकमा अडकल्या आहेत. कोल्हापूर विभागातील संस्थांकडे शासकीय भागभांडवलापोटी १८ कोटी ४८ लाख तर शासकीय कर्जापोटी १२ कोटी ४० लाख व त्यावरील व्याज साडेसहा कोटी रुपये अडकले आहेत.या आर्थिक वर्षात ५ कोटी ५३ लाख रुपयांचे उद्दिष्ट सहकार विभागाला दिले होते. त्यापैकी ५५ लाख ४० हजार रुपये वसूल झाले आहेत. या महिन्याअखेर उर्वरित ४ कोटी ९७ लाख वसुली आव्हान सहकार विभागापुढे आहे.

पॅकेजचे २६.४८ कोटी पतसंस्थांकडून येणेराज्यातील पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी शासनाला पॅकेज द्यायला लावले होते. कोल्हापूर विभागासाठी २०० कोटी रुपये आले होते. त्यापैकी २६ कोटी ४८ लाख रुपये देय आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याकडे १९ कोटी २१ लाख तर सांगली जिल्ह्याकडे ७ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. सातारा जिल्ह्यातील सात संस्थांना पॅकेजचा लाभ झाला होता, त्यांच्याकडून पूर्ण वसूल झाले आहे.

विभागातील संस्थांकडून शासकीय येणी

  • शासकीय भागभांडवल - १८.४८ कोटी
  • शासकीय कर्ज - १२.४० कोटी
  • कर्जावरील व्याज - ६.५० कोटी
  • लेखापरीक्षण फी - १.९० कोटी
  • पतसंस्था पॅकेज - २६.४८ कोटी
  • कर्जमाफी अपात्र रक्कम - ६.९६ कोटी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार