गुंड, अवैध व्यावसायिकांना हद्दपारी, मोका : राजेश गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:56+5:302021-08-27T04:26:56+5:30

कोल्हापूर : गुंड प्रवृत्तीचे व अवैध व्यवसाय करणाऱ्या जास्तीत जास्त गुन्हेगारांवर हद्दपारीची व मोकांतर्गत कडक कारवाई करण्याची मोहीम शाहूपुरी ...

Goons, deportation of illegal traders, Moka: Rajesh Gawli | गुंड, अवैध व्यावसायिकांना हद्दपारी, मोका : राजेश गवळी

गुंड, अवैध व्यावसायिकांना हद्दपारी, मोका : राजेश गवळी

कोल्हापूर : गुंड प्रवृत्तीचे व अवैध व्यवसाय करणाऱ्या जास्तीत जास्त गुन्हेगारांवर हद्दपारीची व मोकांतर्गत कडक कारवाई करण्याची मोहीम शाहूपुरी पोलिसांनी सुरू केल्याची माहिती पो. नि. राजेश गवळी यांनी दिली. त्यांनी गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली.

पो. नि. गवळी हे मूळचे इचलकरंजीचे आहेत. त्यांचे वडील पोलीस खात्यातच होते, त्याचे शिक्षण पुण्यामध्ये झाले. त्यांनी अमरावती, पुणे, सोलापूर येथे सेवा बजावली आहे. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांशी माहिती आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शासकीय कार्यालये असल्याने तेथील उच्चभ्रू लोकांसह सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, हद्दीतील कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.

फोटो नं. २६०८२०२१-कोल-राजेश गवळी (पोलीस इन्स्पेक्टर)

260821\26kol_10_26082021_5.jpg

फोटो नं. २६०८२०२१-कोल-राजेश गवळी (पोलीस इन्स्पेक्टर)

Web Title: Goons, deportation of illegal traders, Moka: Rajesh Gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.