शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:11 IST

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली़ महामानवांच्या शिकवणी अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे़ सध्याच्या डिजिटल युगात कॅशलेस न राहता कास्टलेस राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ़ नीता माने यांनी केले़.

सकाळी नगरपालिकेपासून रॅलीची मूक मोर्चाने सुरुवात झाली़. रॅलीसमोर ‘आम्ही सारे भारतीय’ बॅनर लावण्यात आला होता़ राधिका घोरपडे या युवतीच्या हातात तिरंगा ध्वज देण्यात आला होता़ जुनी भाजी मंडई, तेरावी गल्ली, शिरोळ-वाडी रोड, क्रांती चौक येथून नगरपरिषदेसमोर रॅलीची सांगता झाली़ राज्यात कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला तरी शांतताप्रिय ओळख असणाºया जयसिंगपूर शहरात सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी दक्षता घेतली आहे़ या रॅलीतून राष्ट्राभिमान जागृत होऊन शहराच्या एकीचा संदेश देशात जाणार आहे.

‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़; परंतु कोरेगाव भीमाच्या घटनेने तो संकल्प खंडित झाला़ भविष्यात देशात अथवा राज्यात काहीही घडल्यास सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवून सामाजिक सलोखा बाळगूया आणि बंद न करण्याची परंपरा या पुढेही जोपासूया़ यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी काढण्यात आलेली सद्भावना रॅली ही अभिनंदनीय बाब आहे़ भविष्यात शहर बंद न ठेवता़, सर्वांनी एकत्र येऊन निषेधाची परंपरा जोपासावी़ त्यास पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळेल़

या रॅलीत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, सर्जेराव पवार, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, संगीता पाटील-चिंचवाडकर, अनुराधा आडके, फारूक पठाण, आदींसह नागरिक सहभागी झाले होते़जयसिंगपुरात कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndiaभारत