शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप, ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:55 IST

दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.

ठळक मुद्देदीड दिवसाच्या बाप्पांना निरोप ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार गणेशमूर्तींचा मुक्काम ठरलेला असतो. काही कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो, काही कुटुंबे अनंत चतुर्दशीलाच मूर्ती विसर्जित करतात; तर ९० टक्क्यांहून अधिक लोक गौरी-गणपतीचे एकाच वेळी म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी विसर्जन करतात.

तो येणार येणार म्हणून घराघरांत ज्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती, त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत झाले. खीर-मोदकाचा नैवेद्य झाला. सकाळ-संध्याकाळ आरती झाली. दुसरा दिवस उजाडला, तो लाडक्या गणरायाला निरोप देणारा.ज्या कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो त्यांनी अधिक काळ श्रींचे घरात वास्तव्य ठेवत सायंकाळी उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन केले. शेवटची आरती झाली आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत गणेशमूर्ती घराबाहेर आणण्यात आली.

घराचा अखेरचा निरोप घेऊन नजीकच्या जलाशयाच्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन वाजल्यानंतर घाटावर मूर्ती येण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने काहिली व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पन्हागडावर प्रथमच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पन्हाळा येथील तुषार इनामदार व आशुतोष सोरटे यांनी खोकड तलावाशेजारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले. 

दीड दिवसाच्या गणपतीचे प्रमाण फार कमी असल्याने येथे एक काहील ठेवण्यात आली होती. शिवाय आरतीसाठी टेबलाची सोयही करण्यात आली होती. यंदा महापूर आल्याने पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या नागरिकांना दिले जाणारे ‘सुजाण नागरिक’ हे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ८० हून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर