शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: इचलकरंजीत चांगला रस्ता प्रस्तावित कामांच्या यादीत, चूक लक्षात येताच निधी अन्य कामांसाठी वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:13 IST

अतुल आंबी इचलकरंजी : नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्त्यांसाठी ५२ कोटीं निधी मंजूर झाला आहे. पैकी २५ लाख ५५ हजार ...

अतुल आंबीइचलकरंजी : नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्त्यांसाठी ५२ कोटीं निधी मंजूर झाला आहे. पैकी २५ लाख ५५ हजार ६६६ रुपये निधी मंजूर झालेला एक रस्ता सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो निधी त्या भागातील अन्य अंतर्गत पाच रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे या योजनेतून मंजूर केलेल्या अन्य रस्त्यांचीही शहानिशा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला ५२ कोटी निधी सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करून त्यांच्यामार्फत कामे सुरू आहेत. त्यातील काही रस्त्यांच्या दर्जाबाबत तक्रारीही झाल्या आहेत. परंतु, त्याची दखल न घेता कामे सुरूच आहेत. त्यात बरगाले कॉटन ते हनुमान मंदिर रस्ता डांबरीकरणासाठी २५ लाख ५५ हजार ६६६ रुपये निधी मंजूर झाला होता. प्रत्यक्षात हा रस्ता चांगलाच असल्याचे लक्षात आल्याने हे काम थांबले.सुस्थितीतील रस्ता पुन्हा करण्याऐवजी त्या भागातील अंतर्गत अन्य पाच रस्त्यांसाठी हा निधी वापरण्याचा निर्णय महापालिका प्रशासकाने ठराव करून घेतला आहे. तसे त्यांनी ३ मार्चला सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवला आहे. चांगला रस्ता पुन्हा करून निधीचा अपव्यय टाळण्यासाठी हा चांगला निर्णय आहे. परंतु, रस्ते मंजुरीसाठी पाठविताना त्याची शहानिशा न करताच प्रस्ताव पाठविल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

ही नवी कामे होणार

  • रुपाली ज्वेलर्स ते भागीरथी ज्वेलर्स/बी ॲंड बी टायर कंपनीपर्यंत दक्षिणोत्तर रस्ता. एकूण लांबी (मीटर) १३५. अंदाजित रक्कम ५८१३३०.
  • गंगा शुद्ध पेयजल/ईझी मोबाइल, कैलास उरणे घर ते कालीक साऊंड सिस्टीम सचिन सुतार घर, बी. एम. पाटील घरापर्यंतचा दक्षिणोत्तर रस्ता. एकूण लांबी (मीटर) १३०. अंदाजित रक्कम ५४२४६०.
  • वीरशैव बॅँक (मेन रोड) ते पोतदार ज्वेलर्स, बळवंत सुतार घर, विश्वकर्मा बिल्डींगपर्यंतचा पूर्व-पश्चिम रस्ता. एकूण लांबी (मीटर) १६५. अंदाजित रक्कम ४२२९३०.
  • सुरेश फोटो स्टुडिओ/हरीश असोसिएटस ते बिडला माजी नगरसेवक रुपचंद शहा घर, विजय लोखंडे घर पूर्व-पश्चिम रस्ता. एकूण लांबी (मीटर) ६५. अंदाजित रक्कम ३००७६०.
  • उरणे घर/आमणे घर ते मेन रोडपर्यंत सुरज बर्थ डे शॉपीपर्यंतचा श्रीराम मंदिरसमोरील रस्ता. एकूण लांबी (मीटर) ११५. अंदाजित रक्कम ६६७६९०. एकूण - २५१५१७०.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणीवपूर्वक वर्ग केली आहेत. एकूणच मनमानी कारभार सुरू आहे. शहरातील सुस्थितीतील रस्ता मंजुरीसाठी पाठविणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी. तसेच, या योजनेतील मंजूर असलेल्या सर्व कामांची चौकशी करावी. - शशांक बावचकर, कॉंग्रेस प्रदेश सचिव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी