विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, शिवाजी विद्यापीठातील अभ्यासिका खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:56+5:302021-09-23T04:27:56+5:30

शासनाचे नियम, जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोरोनाबाबतच्या आदेशांचे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार ...

Good news for students, study at Shivaji University is open | विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, शिवाजी विद्यापीठातील अभ्यासिका खुली

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, शिवाजी विद्यापीठातील अभ्यासिका खुली

शासनाचे नियम, जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठ प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोरोनाबाबतच्या आदेशांचे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. अभ्यासिकेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोरोनाच्या लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन चौदा दिवस झाल्याची खातरजमा करण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्षातील २०२०-२१ या वर्षातील प्रवेशित पदव्युत्तर विद्यार्थी, एम.फिल., पीएच.डी. व संशोधक विद्यार्थ्यांकडे ज्ञानस्रोत केंद्राचे अथवा स्टडी सेंटर विभागाचे चालू वर्षीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. कार्यालयीन सुट्टीदिवशी, प्रत्येक रविवारी, दुसरा व चौथा शनिवार दोन्ही अभ्यासिका पूर्णपणे बंद राहतील. राज्य शासन, जिल्हा आणि विद्यापीठ प्रशासन नियमानुसार पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच मुख्य अभ्यासिकेत प्रवेश दिला जाईल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी योग्य शारीरिक सुरक्षित अंतराबाबतचे नियम पाळून बसावे, असे आवाहन ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी बुधवारी केले आहे.

फोटो (२२०९२०२१-कोल-युनिर्व्हिसिटी स्टडी सेंटर) : शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे मुख्य अभ्यासिका आणि स्टडी सेंटर अभ्यासिका बुधवारी ५० टक्के उपस्थितीच्या नियमानुसार खुली करण्यात आली.

220921\22kol_4_22092021_5.jpg

फोटो (२२०९२०२१-कोल-युनिर्व्हिसिटी स्टडी सेंटर) : शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे मुख्य अभ्यासिका आणि स्टडी सेंटर अभ्यासिका बुधवारी ५० टक्के उपस्थितीच्या नियमानुसार खुली करण्यात आली.

Web Title: Good news for students, study at Shivaji University is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.