महानगरपालिकेचे भाग्यच.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:06+5:302021-09-11T04:25:06+5:30
महापालिकेतील कोणत्याही कामात त्रुटी काढणे, त्या वारंवार काढणे, जाणीवपूर्वक फाईल्स प्रलंबित ठेवणे याची कारणं आता सर्वांनाच माहीत आहेत. फाईल ...

महानगरपालिकेचे भाग्यच.....
महापालिकेतील कोणत्याही कामात त्रुटी काढणे, त्या वारंवार काढणे, जाणीवपूर्वक फाईल्स प्रलंबित ठेवणे याची कारणं आता सर्वांनाच माहीत आहेत. फाईल प्रलंबित राहिली की ज्याचं काम असतं, त्याला त्याचा संदेश मिळतो. आता काही तरी वजन ठेवावं लागणार ! महापालिकेतील मुरलेल्या अधिकाऱ्यांकडून हा प्रकार घडत असल्याचे आधी पाहायला मिळायचे पण मुरलेल्यांची मक्तेदारी आता संपली असावी, असे वाटणाऱ्या घटना अलीकडे नवीन आलेल्या अधिकाऱ्यांकडूनही पाहायला मिळत आहेत. अजून त्यांना येथे येऊन वर्षही झाले नाही, तोपर्यंत ही अधिकारी मंडळी फाईलमधून ‘कोंडा’ काढायला लागलीत. फाईलवर सामुदायिक अभ्यास करायला लागलीत. नागरिकांच्या दृष्टीने आरोग्याचा प्रकल्प अगदी कमी खर्चात, कमी वेळे जुन्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. प्रकल्प पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अधिक वेळ आता त्यांची बिलं भागवताना होतो की काय अशी शंका फाईलमध्ये त्रुटी शोधून ‘कोंडा’ काढण्याच्या प्रवृत्तीमुळे येऊ लागली लागली आहे. नॉन टेक्निकल अधिकारी इतके टेक्निकल एक्सपर्ट मिळाले हे महापालिकेचे भाग्य म्हणायचे की ठेकेदारांचे दुर्भाग्य?
-भारत चव्हाण