शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:33 IST

chandrakant patil Bjp Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गुरूवारी त्यांच्या वाढदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोनव्दारे अभीष्टचिंतन केले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव अमित शहा, गडकरी, फडणवीसांनीही केले अभीष्टचिंतन

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गुरूवारी त्यांच्या वाढदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोनव्दारे अभीष्टचिंतन केले.पाटील हे वाढदिनी गुरूवारी पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. रात्री ते कोल्हापुरात आले. शुक्रवारी सकाळीच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उद्योजक शंकर पाटील यांच्यासह पाटील यांची निवासस्थानी भेट देवून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पाटील यांच्या संभाजीनगरमधील निवासस्थानी दुपारनंतर शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली. आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वत फेटा बांधून पाटील यांचा शाल घालून सत्कार केला. आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक,भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, संचालिका शौमिका महाडिक, स्वरूप महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि. प. सदस्य राहूल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, निवास साळोखे, उत्तम कांबळे, भारत खराटे, आण्णासाहेब चकोते, भरत ओसवाल, सुरेंद्र जैन, जयेश कदम, भाजपचे बाराही तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.भूपेंद्र यादव, सुरेश प्रभू, सतीश पुनिया, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, गिरीष महाजन, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट यांनीही त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने गेले दोन दिवस अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी कणेरी मठावर उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पालाही मदत केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर