‘अच्छे दिन’ ‘बुरे’ करणाऱ्यांचा बुरखा फाडा

By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:35:29+5:302015-05-29T00:01:31+5:30

कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजीत काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

The 'good days' burst into the 'bad days' | ‘अच्छे दिन’ ‘बुरे’ करणाऱ्यांचा बुरखा फाडा

‘अच्छे दिन’ ‘बुरे’ करणाऱ्यांचा बुरखा फाडा

इचलकरंजी : केंद्रातील सत्तेची वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या मोदी सरकारने दिलेल्या सर्वच आश्वासनांना हरताळ फासला आहे. केलेल्या सगळ्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. म्हणूनच विकासापेक्षा परदेश वाऱ्यावर भर देणाऱ्या अन् ‘अच्छे दिन’ला ‘बुरे’ बनविणाऱ्या मोदी सरकारचा बुरखा फाडून त्यांचे खरे रूप कार्यकर्त्यांनी जनतेला दाखवून द्यावे, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून, भाजप आणि मोदींनी जनतेला भुरळ पाडणारी ‘अच्छे दिन’ची दिलेली वचने पाळली नाहीत. अच्छे दिनची ‘पहिली पुण्यतिथी’ म्हणून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी आवाडे बोलत होते.
सुरुवातीला शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रदेश कॉँग्रेस समितीच्यावतीने देण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा सादर केला. नगरसेवक शशांक बावचकर यांनी, भाजपने कॉँग्रेसबद्दल गैरसमज पसरविण्यात यश मिळविले आहे, न पाळता येणारी आश्वासने दिली व जनतेची फसवणूक केली असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शहर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शामराव कुलकर्णी, अशोकराव सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, तौफिक मुजावर, राहुल खंजिरे, महावीर कुरुंदवाडे, सुजाता भोंगाळे, रत्नप्रभा भागवत, नजमा शेख, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The 'good days' burst into the 'bad days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.