चांगले उमेदवार बाजूला जातील म्हणूनच ‘स्वबळावर’ - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:19+5:302021-01-08T05:14:19+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या मागील तीन निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो आणि नंतर आघाडी केली. त्याप्रमाणेच यावेळेलाही आम्ही स्वतंत्र लढणार ...

चांगले उमेदवार बाजूला जातील म्हणूनच ‘स्वबळावर’ - हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या मागील तीन निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो आणि नंतर आघाडी केली. त्याप्रमाणेच यावेळेलाही आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, चांगले उमेदवार बाजूला जातील म्हणूनच स्वबळावर लढावे लागत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जादा जागा निवडून आणण्याचा काॅंग्रेसचा प्रयत्न आहे. प्रत्येकजण आपल्या जागा कशा जास्त येतील, हे पाहणार आहे. त्यातच आता काॅंग्रेसचे शहरात तीन आमदार असल्याने ते स्वबळावर सत्ता आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो चुकीचा म्हणता येणार नाही. आमचे मात्र रेड्यापाड्याचे औत आहे, ते घेऊन पुढे चाललो आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर ‘नो कॉमेंट्स’
औरंगाबाद नामांतरावरून महाविकास आघाडीत मतमतांतर असल्याबाबत विचारले असता, त्यावर योग्यवेळी आपण बोलू, असे सांगत एरव्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवणारे मंत्री मुश्रीफ यांना पाटील यांच्याबाबत विचारले असतो, ‘नो कॉमेंट्स’ एवढेच उत्तर दिले. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सारथ्य करणारे प्रा. जयंत पाटील यांच्या वेगळ्या भूमिकेबाबतही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीत जनतेचा कौल महत्वाचा
बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी काही आमदार व मंत्र्यांनी बक्षीस जाहीर केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, माझा लोकशाहीवर विश्वास आहे. लोकांचा कौल महत्वाचा असतो.