गोमती नाल्याने काहीअंशी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:49+5:302021-04-05T04:20:49+5:30

कोल्हापूर : वाढत्या वसाहतीकरणामुळे मोरेवाडीच्या मागील बाजूस असलेल्या चित्रनगरीच्या डोंगरावर उगम पावणाऱ्या गोमती नाल्याचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब ...

Gomati Nala took a deep breath | गोमती नाल्याने काहीअंशी घेतला मोकळा श्वास

गोमती नाल्याने काहीअंशी घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर : वाढत्या वसाहतीकरणामुळे मोरेवाडीच्या मागील बाजूस असलेल्या चित्रनगरीच्या डोंगरावर उगम पावणाऱ्या गोमती नाल्याचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब ध्यानी घेऊन रविवारी सकाळी गोमती किनारी राहणाऱ्या नागरिकांनी या नाल्यासह परिसराची स्वच्छता केली. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा केला. त्यामुळे या नाल्याने काहीअंशी मोकळा श्वास घेतला.

या मोहिमेत राजेंद्रनगर, मोरेवाडी, रेव्हेन्यू काॅलनी, अरुणोदय सोसायटी, चिले काॅलनी, म्हाडा काॅलनी, डी. आर. भोसले नगर, समता काॅलनी, शांतीनिकेतन परिसर आणि गोमती किनारी राहणाऱ्या अन्य रहिवाशांनी सहभाग घेतला. यावेळी निहाल शिपूरकर, तनुजा शिपूरकर, उदय नारकर, सुधाकर सावंत, आदित्य खेबुडकर, वास्तूविशारद मोहन वायचळ, अर्चना कुलकर्णी, सुभाष वाणी, सुभाष जाधव, विश्वजित साखरे, रशिया पडळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो : ०४०४२०२१-कोल-गोमती नाला

फोटो : गोमती किनारी राहणाऱ्या नागरिकांतर्फे रविवारी मोरेवाडी परिसरातील गोमती नाल्यासह परिसराची स्वच्छता करण्यात आली.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Gomati Nala took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.