गोलिवडेच्या शेतकऱ्याला उपचारासाठी मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST2021-08-19T04:27:34+5:302021-08-19T04:27:34+5:30

गोलिवडे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी प्रभुनाथ पांडुरंग गुरव (वय ४०)हे जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले असताना त्यांच्या मानेवर ...

Goliwade farmer needs help for treatment | गोलिवडेच्या शेतकऱ्याला उपचारासाठी मदतीची गरज

गोलिवडेच्या शेतकऱ्याला उपचारासाठी मदतीची गरज

गोलिवडे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी प्रभुनाथ पांडुरंग गुरव (वय ४०)हे जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले असताना त्यांच्या मानेवर वैरणीचा भारा पडल्याने मानेला जोराचा मार लागला. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांच्या उपचारासाठी समाजातील दानशूर मंडळींनी मदत करण्याची गरज आहे. गुरव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्याचा खर्च पाच ते सहा लाख रुपये येणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पुढे येवून गुरव कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी असे आवाहन सद्गुरु श्री योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशन व गुरव कुटुंबीयांनी केले आहे. दरम्यान, फाउंडेशनच्यावतीने गावातून ८० ते ९० हजार रुपयांचा मदतनिधी गोळा करण्यात आला असून, ऑपरेशनसाठी आणखीन मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. प्रभुनाथ गुरव

मदतीसाठी संपर्क

उत्तम बाबूराव गुरव

गुगल पे व फोन पे नंबर 9637221296.

union Bank of India A/C--321402010113007 SC CODE-UBIN0532142.

Web Title: Goliwade farmer needs help for treatment