कोल्हापूर : येथील तावडे हॉटेलकडून इस्लामपूरला बसने निघालेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचा लक्ष्मीहार व रोख १८०० असा सुमारे ८१ हजार ८०० रुपयेचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. याबाबत शारदा राजेंद्र तडाके (वय ३५ रा. दत्त कॉलनी, कणेरी, ता. करवीर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शारदा तडाके ह्या रविवारी सायंकाळी तावडे हॉटेल चौकातील बसस्टॉपवरुन इस्लामपूरला बसने जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पर्समधील दोन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार व रोकड असा मुद्देमाल अज्ञाताने चोरल्याचे लक्षात आले, याबाबत त्यांनी एमआयडीसी शिरोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली, ही तक्रार सोमवारी रात्री शाहुपूरी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली.
महिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचा लक्ष्मीहार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:26 IST
Crime News Kolhapur- कोल्हापूर येथील तावडे हॉटेलकडून इस्लामपूरला बसने निघालेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचा लक्ष्मीहार व रोख १८०० असा सुमारे ८१ हजार ८०० रुपयेचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. याबाबत शारदा राजेंद्र तडाके (वय ३५ रा. दत्त कॉलनी, कणेरी, ता. करवीर) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचा लक्ष्मीहार लंपास
ठळक मुद्देमहिला प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचा लक्ष्मीहार लंपासतक्रार शाहुपूरी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग