रस्सीखेच स्पर्धेत कोल्हापूरला सुवर्ण
By Admin | Updated: July 30, 2014 00:29 IST2014-07-30T00:18:32+5:302014-07-30T00:29:04+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा : १९ वर्षाखालील कुमारी गटात कांस्यपदक

रस्सीखेच स्पर्धेत कोल्हापूरला सुवर्ण
कोल्हापूर : संगमनेर येथे झालेल्या राज्य रस्सीखेच स्पर्धेत कोल्हापूर संघांनी एक सुवर्ण व एक कास्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत कोल्हापूरच्या १७ वर्षाखालील किशोर गटाने सुवर्ण पदक पटकाविले. या संघात विद्या दळवी, प्राजक्ता पाटील, धनश्री पाटील, प्रियंका माणगावे (सर्व कवठेसार), सलोनी आरेकर, हर्षदा कचरे, फरिन शेख (सर्व इचलकरंजी) निशिगंधा यादव, सोफिया सय्यद (अतिग्रे).१९ वर्षाखालील कुमारी गटात कास्य पदक पटकाविले. या संघात सोनल सावंत, आसावरी ढोंगे, सिध्दी शिंदे, कस्तुरी बेडगी (सर्व दिंडनेर्ली), पूजा पाटील, काजल महाडीक (गारगोटी), किरण पाटील (ठिकपूर्ली), स्नेहा किणीकर (कवठेसार), हर्षदा मगदूम, निशिगंधा बाटूंगे यांचा समावेश होता. या स्पर्धेत अहमदनगर, सांगली, सातारा, नाशिक, लातूर, कोल्हापूर येथील संघ सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंना संघटनेचे उपाध्यक्ष विवेक हिरेमठ, पांडूरंग पाटील, सचिव तृप्ती खत्री, प्रशिक्षक रोहित पाटील, विशाल करे, डॉ. प्रकाश संघवी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभिषण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)