जुन्नर येथे ‘गोकूळ’ची दूध शॉपी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:37+5:302021-06-20T04:17:37+5:30

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे त्रिमूर्ती एजन्सीज यांच्या सहकार्याने गोकुळ दूध संघाच्या पहिल्या शॉपीचे उद्घाटन ...

Gokul's milk shop starts at Junnar | जुन्नर येथे ‘गोकूळ’ची दूध शॉपी सुरू

जुन्नर येथे ‘गोकूळ’ची दूध शॉपी सुरू

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे त्रिमूर्ती एजन्सीज यांच्या सहकार्याने गोकुळ दूध संघाच्या पहिल्या शॉपीचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले.

संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जन्‍मस्‍थळी शिवनेरी किल्ल्याच्‍या पायथ्याशी संघाच्‍या पहिल्‍या शॉपीचे उद्घाटन करता आले याचा मला व गोकुळ परिवाराला अभिमानास्पद आहे. गोकूळ या बोधचिन्‍हाचा अतिशय मोठा बोलबाला असून तो सर्वांच्‍या आवडीचा ब्रॅंड आहे. शुद्धता व मधुर चवीने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना भुरळ पाडली आहे. जुन्नर तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीसही दूध व उत्पादने निश्चितपणे उतरतील.

या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर आदी पदार्थ उपलब्ध असणार आहेत. भविष्‍यात गोकुळ पुणे ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्‍थांनी सहकार्य केले. तर दूध संकलनाची व्‍यवस्‍था करून व शेतक-याचे हित जोपासण्‍याचे काम गोकूळ परिवार करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

गोकुळने दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ उपलब्ध करून दिल्‍याबद्दल आभार मानत माजी पंचायत समिती सदस्‍य बाजीराव ढोले म्हणाले, पुण्यात संकलन चालू करण्‍याचा मानस आहे, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू. कुमार गोडकर, धनराज खोत, दीपेशसिंह परदेशी, शिवा डोंगरे, गोकूळ दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकूळ’च्या जुन्नर (जि. पुणे) येथील पहिल्या शॉपीचे उद्घाटन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजीराव ढोले, कुमार गोडकर, रोहित परदेशी, संकेत साबळे आदी उपस्थित होते. (फोटो-१९०६२०२१-कोल-गोकूळ)

Web Title: Gokul's milk shop starts at Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.