नेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:36 AM2021-02-01T10:36:14+5:302021-02-01T10:37:57+5:30

Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महापूर व त्यानंतर कोरोनाच्या संकटात दूध उत्पादकांना आधार दिल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे तर आर्थिक वर्षात झालेल्या जादा खर्चावर विरोधक आक्रमक होणार आहेत.

Gokul's meeting will be held on Wednesday without leaders | नेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा

नेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा

Next
ठळक मुद्देनेत्यांविनाच बुधवारी होणार गोकुळची सभा निवडणूकीची किनार : अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महापूर व त्यानंतर कोरोनाच्या संकटात दूध उत्पादकांना आधार दिल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे तर आर्थिक वर्षात झालेल्या जादा खर्चावर विरोधक आक्रमक होणार आहेत.

गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते सभेला उपस्थित राहणार नाहीत. ते मोबाईलद्वारे संस्थाचालकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे संचालक मंडळातील सर्वात ज्येष्ठ संचालक म्हणून अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारची सभा होणार आहे. महापूर व त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटात गोकुळने दूध उत्पादकांना सावरण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर सुविधांबाबतही व्यवस्थापन सभेत आपली बाजू मांडणार आहे. विरोधक जादा झालेल्या खर्चाचा मुद्दा घेऊन आक्रमक होणार आहे.

मागील सभेत मल्टिस्टेटचा मुद्दा असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्यासह विरोधी गटाचे नेते झाडून उपस्थित होते. मात्र, या सभेला हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असली तरी गेली महिनाभर विरोधकांनी सभेची तयारी केली असल्याने जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

सतेज पाटील अनुपस्थित राहणार

मागील दोन सर्वसाधारण सभेला पालकमंत्री सतेज पाटील हे स्वत: उपस्थित राहिल्याने विरोध गटाला ताकद मिळाली होती. मात्र, यावेळेला मंत्री पाटील हे परदेशात असल्याने सभेला ते उपस्थित राहण्याची शक्यता धूसर आहे.

वीस वर्षांनंतर नरकेंना संधी

अरुण नरके हे १९९० ते २००० या कालावधीत गोकुळचे अध्यक्ष राहिले. वीस वर्षांनंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सभा होत आहे. विशेष म्हणजे गोकुळची आगामी निवडणूक ते लढविणार नसल्याने ही सभा त्यांची शेवटची ठरणार आहे.

Web Title: Gokul's meeting will be held on Wednesday without leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.