‘गोकुळ’च्या व्यवस्थापकीय संचालकाची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:14+5:302021-08-22T04:28:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) व्यवस्थापकीय संचालकाच्या नावावर आज, रविवारी शिक्कामोर्तब होणार ...

Gokul's managing director elected today | ‘गोकुळ’च्या व्यवस्थापकीय संचालकाची आज निवड

‘गोकुळ’च्या व्यवस्थापकीय संचालकाची आज निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) व्यवस्थापकीय संचालकाच्या नावावर आज, रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे. निवड समितीकडून तीन नावे निश्चित केली असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे यापैकी एक जणाची निवड करणार आहेत.

डी. व्ही. घाणेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी २१ जणांनी अर्ज दाखल केले हाेते. प्रत्यक्षात मुलाखतीसाठी १५ जण हजर झाले. यामध्ये एनडीडीबी, महानंदाचे अधिकारी आले होते. त्याचबरोबर मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठीही मुलाखती घेण्यात आल्या. या दोन्ही पदासाठी मुलाखत घेतलेल्यांपैकी तीन-तीन नावे निश्चित करण्यात आली. या तिघांची आज, सकाळी ११ वाजता मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील हे मुलाखती घेणार आहेत. त्यांनी दोन्ही पदासाठी एक-एक नाव निश्चित करून ते संचालक मंडळाकडे देणार आहेत. व्यवस्थापकीय संचालक पदासाठी एनडीडीबीसह इतर दूध संघाचे मातब्बर अधिकारी मुलाखतीसाठी आले होते. यातील एकाची निवड करताना नेत्यांचा कस लागणार आहे.

Web Title: Gokul's managing director elected today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.