सत्तांतरानंतर गोकूळची आज पहिली ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST2021-09-24T04:29:12+5:302021-09-24T04:29:12+5:30

कोल्हापूर : तब्बल ३० वर्षांच्या सत्तांतरानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी ऑनलाईन ...

Gokul's first online meeting after independence | सत्तांतरानंतर गोकूळची आज पहिली ऑनलाईन सभा

सत्तांतरानंतर गोकूळची आज पहिली ऑनलाईन सभा

कोल्हापूर : तब्बल ३० वर्षांच्या सत्तांतरानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने होत आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात दुपारी १ वाजता होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील असणार आहे.

सत्तांतर होऊन चार महिने झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पहिल्यांदाच या सभेला सामोरे जावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी संघाला चार महिन्यांत नफ्यात आणल्याचा, तर विरोधकांनी तोटा वाढविल्याचा परस्परविरोधी आरोप केल्याने आजच्या सभेत वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

आठ दिवसांपूर्वी सभेची विषयपत्रिका पाठवण्यात आली आहे, प्रश्नही मागवले होते; पण कोेणीही प्रश्न पाठवलेले नाहीत. दरम्यान, विरोधकांनी ३२४ कोटींच्या कर्जाचा मुद्दा गोकुळ सभासदांच्या हिताशी जोडत हा विषय खुल्या सर्वसाधारण सभेतच घ्यावा, अशी मागणी केल्याने आजच्या सभेत हा विषय मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Gokul's first online meeting after independence